logo

फ्रॉड करण्याची विशेष पदधत

फसवणूक करणारे तृतीय पक्ष फिशिंग वेबसाइट तयार करतात जी - बँकेची वेबसाइट किंवा ई-कॉमर्स वेबसाइट किंवा सर्च इंजिन इत्यादी विद्यमान अस्सल वेबसाइटसारखी दिसते.

•शॉर्ट मेसेज सर्व्हिस (SMS) / सोशल मीडिया / ईमेल / इन्स्टंट मेसेंजरच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यांकडून या संकेतस्थळांच्या लिंक प्रसारित केल्या जातात.

•बरेच ग्राहक तपशीलवार युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर (URL) न तपासता लिंकवर क्लिक करतात आणि पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर (PIN), वन टाइम पासवर्ड (OTP), पासवर्ड इ. सारखे सुरक्षित क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करतात, जे चोरटे कॅप्चर करून वापरतात.

खबरदारी

•अज्ञात / अप्रमाणित लिंकवर क्लिक करू नका आणि अनोळखी व्यक्तीने पाठवलेले असे SMS / ईमेल भविष्यात चूकीने ॲक्सेस होऊ नयेत यासाठी ताबडतोब डिलीट करा.

•बँक / ई-कॉमर्स / सर्च इंजिन वेबसाइटच्या लिंक्स प्रदान करणारे मेल अनसबस्क्राइब करा आणि असे ई-मेल डिलीट करण्यापूर्वी प्रेषकाचा ई-मेल ID ब्लॉक करा.

•नेहमी आपल्या बँकेच्या / सर्व्हिस प्रदात्याच्या अधिकृत वेबसाईटवर जा. विशेषत: जिथे आर्थिक क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करणे आवश्यक आहे तेथे ‌वेबसाइट तपशील काळजीपूर्वक पडताळून पहा. सुरक्षित क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करण्यापूर्वी वेबसाइटवरील सुरक्षित चिन्ह (पॅडलॉक चिन्हासह https) तपासा.

•स्पेलिंग त्रुटींसाठी ईमेलमध्ये प्राप्त URL आणि डोमेन नावे तपासा. संशय आल्यास कळवा  

मुख्यपृष्ठावर परत